ठाकरे गटाला मोठा धक्का; चंद्रहार पाटील यांचा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सांगली लोकसभा निवडणूक लढलेले पैलवान चंद्रहार पाटील यांनी आज उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केला असून ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे . गेल्या अनेक दिवसांपासून चंद्रहार पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये येत होत्या. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाठ यांनी मागील आठवड्यात