१. माथेरान
माथेरान मुंबई जवळचे एक सुंदर हिल स्टेशन आहे. इथे तुम्ही घोडागाडीने फिरू शकता.
२) लोणावळा
लोणावळा हे निसर्गरम्य ठिकाण मुंबई आणि पुणे जवळ असल्याने पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करते.
३) महाबळेश्वर
येथे विविध धबधबे, धरणे आणि निसर्गरम्य दृश्ये आहेत ज्यामुळे पावसाळ्यात अनेक पर्यटक येतात.
४) अजिंठा-वेरूळ
अजिंठा आणि वेरूळच्या गुंफा पाहण्यासाठी पावसाळ्यात पर्यटक गर्दी करतात.
५) विसापूर किल्ला
पावसाळ्यात या किल्ल्याला भेट दिल्यास ट्रेकिंगचा अनुभव अधिक रोमांचक होतो. लोणावळ्याजवळ हा किल्ला आहे.
६) देवकुंड धबधबा
देवकुंड धबधबा हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात असून एक दिवसाच्या ट्रेकसाठी उत्तम ठिकाण आहे.
७) माळशेज घाट
माळशेज घाट हा घनदाट हिरवाईसाठी, भव्य धबधब्यांसाठी, शांत तलावांसाठी प्रसिद्ध आहे. पुणे आणि ठाणे जिल्ह्यात हा घाट येतो.
८) ताम्हिणी घाट
ताम्हिणी घाटात पावसाळ्यात धबधब्यांचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. हा घाट पुण्यातील मुळशी आणि रायगड जिल्ह्यातील माणगांव यांना जोडतो.
९) वरंध घाट
वरंध घाट हा पुणे जिल्ह्यातील भोर आणि रायगड जिल्ह्यातील महाडला जोडतो. पावसाळ्यात इथे निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेता येतो.
१०) सिंहगड किल्ला
पुण्यापासून ३० किमी अंतरावर असणारा हा किल्ला बघण्यासाठी पर्यटक पावसाळ्यात गर्दी करतात.
Learn more