युवासेनेचे युवा संपर्क अभियान संगमनेर मध्ये जल्लोषात संपन्न

babanrao gholap
संगमनेर- युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि युवासेना सचिव वरून सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात युवासेनेचे युवा संपर्क अभियान (Yuva Sampark Abhiyan) सुरु असून त्याचा एक टप्पा आज (दिनांक २२ जुलै, २०२३) रोजी संगमनेर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

शिवसेनेत पडलेल्या मोठ्या फुटीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आता कंबर कसली असून  राज्यभरात अनेक मेळावे आयोजित करून तळागाळातील शिवसैनिकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्याकडून सुरु असून त्यात आता युवासेनाही सक्रिय सहभागी होत असून राज्यभरात सध्या युवासेनेतर्फे ‘युवा संपर्क अभियान” सुरु आहे. या अभियानाचा एक टप्पा संगमनेर, अकोले आणि शिर्डी या तीन विधानसभा मतदारसंघांसाठी संगमनेर येथे पार पडला. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने युवासेना कोअर कमिटी सदस्य अंकित सुनिल प्रभू, युवासेनेचे विभागीय सचिव विराज कावडीया, शिवसेना संगमनेर विधानसभा संपर्क प्रमुख अजय व्हनोळे, युवासेना शिर्डी लोकसभा विस्तारक मितेश साटम, शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख बबन नाना घोलप यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यापारी असोसिएशन हॉल संगमनेर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

येत्या काही दिवसांत शिर्डी लोकसभेत युवासेनेच्या आणखी शाखा सुरु करणार – मितेश साटम

mitesh satam

यावेळी जमलेल्या युवासैनिकांना युवासेना शिर्डी लोकसभेचे विस्तारक मितेश साटम यांनी मार्गदर्शन केले. शिर्डी लोकसभेत येणाऱ्या काही दिवसांत युवासेनेच्या अनेख शाखा सुरु करून दाखवण्याचा निर्धार यावेळी साटम यांनी व्यक्त केला असून संगमनेर, अकोले आणि शिर्डी विधानसभेतील पदाधिकारी आणि युवासैनिकांच्या पाठीशी संपूर्ण ताकदीने उभे राहणार असल्याची ग्वाही दिली.

प्रामाणिक शिवसैनिकांना येणाऱ्या काळात संधी देणार – विराज कावडीया

युवासेनेचे विभागीय सचिव विराज कावडीया यांनीही उपस्थित युवासैनिकांना मार्गदर्शन करून मेळाव्याचे आयोजन करणाऱ्या पदाधिकारी आणि युवासैनिकांचे त्यांनी विशेष कौतुक केले. पुढील काळात पक्षाशी प्रामाणिक असणाऱ्या सर्वसामान्य शिवसैनिकांना संधी देणार असल्याचा विश्वास त्यांनी दिला.

शिवसैनिकांनी आतापासून निवडणुकांच्या तयारीला लागावे – अजय व्हनोळे

आगामी काळात होणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी सर्व शिवसैनिकांनी आतापासूनच तयारीला लागून पक्षाचे ध्येय, धोरणे तळागाळापर्यंत पोहचवण्याचे काम करावे असे आवाहन शिवसेना संगमनेर विधानसभा संपर्कप्रमुख अजय व्हनोळे यांनी उपस्थितांना केले.

निष्ठावंत शिवसैनिक आजही उद्धव ठाकरे यांच्यासोबत – अंकित प्रभू

ankit sunil prabhu

युवासेनेचे कोअर कमिटी सदस्य अंकित प्रभू यांनी या मेळाव्यात जोशपूर्ण भाषण करून उपस्थित युवासैनिकांची मन जिंकली. शिंदे गटात गेलेल्या ४० आमदारांसह त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. शिर्डी लोकसभेचे खासदार सदाशिव लोखंडे यांचे नाव न घेता त्यांनी त्यांच्या एकूणच कार्यपद्धतीवर जोरदार हल्ला चढवला. उद्धव ठाकरे यांची जनसामान्य लोकांमधील असलेली चांगली प्रतिमा कमी होत नसल्याने सध्याचे सरकार निवडणूक घ्यायला जाणीवपूर्वक उशीर करत असल्याचा आरोप यावेळी अंकित प्रभू यांनी केला.

येणाऱ्या निवडणूक ह्या शिवसैनिकांच्या – बबनराव घोलप

मेळ्याव्यात जवळपास सर्वच वक्त्यांनी बबनराव घोलप यांचा शिर्डी लोकसभेचे भावी खासदार म्हणून उल्लेख केला. हाच धागा पकडून बबनराव घोलप यांनी सर्वांचे आभार मानले. तुमच्या मनात मला जी जागा दिली आहे त्याबद्दल मी आपला ऋणी असून मी फक्त खासदार व्हावा म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित नसून आधी शिवसैनिकांनी मोठे व्हावे, आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या निवडणूका शिवसैनिकांनी लढायच्या आहेत. शिवसैनिक मोठे झाले तरच आम्ही मोठे होऊ असंही घोलप यांनी म्हटले आहे. आपल्या भाषणात बबनराव घोलप यांनी अंकित प्रभू यांनी केलेल्या भाषणाचेही कौतुक केले.

शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सपनाताई मोरे यांनाही उपस्थितांना मार्गदर्शन केले. युवती सेनेच्या नवीन नियुक्त्या करण्याची मागणी त्यांनी संपर्कप्रमुख बबनराव घोलप यांच्याकडे केली. संगमनेर शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी यांनी युवासैनिकांनी या मेळाव्यासाठी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक करून संगमनेर मधील सर्व शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली.

yuvasena sangamner

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवासेना संगमनेर शहरप्रमुख गोविंद नागरे यांनी केले. मान्यवरांचे स्वागत युवासेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण यांनी केले. यावेळी संगमनेर शिवसेना तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, संजय फड, अकोले तालुकाप्रमुख मनोज मोरे, अकोले युवासेना शहरप्रमुख महेश हासे, कोपरगाव महिला प्रमुख विसपुते ताई, संगमनेर महिला तालुकाप्रमुख शीतल ताई हासे, आशा केदारी, संगीता गायकवाड, वैशाली वडतले, युवासेनेचे जिल्हा समन्वयक फैसल सय्यद, उपजिल्हा समन्वयक पप्पू कानकाटे, युवासेना उपजिल्हाप्रमुख वैभव अभंग, संगमनेर तालुका समन्वयक अक्षय बिल्लाडे, विधानसभा प्रमुख अमोल डुकरे, युवासेना संगमनेर तालुकाप्रमुख अक्षय गुंजाळ, युवासेना संगमनेर पठार भाग तालुकाप्रमुख योगेश खेमनर, युवासेना संगमनेर शहरप्रमुख गोविंद नागरे, युवासेना संगमनेर उप-शहरप्रमुख अक्षय गाडे, उप-तालुकाप्रमुख सागर भागवत, जना नागरे, सचिन साळवे, शिवसेना उपशहर प्रमुख मुस्लिम मावळा अजीज मोमीन, इम्तियाझ शेख, दीपक वन्नाम, सुदर्शन ईटप, वेणुगोपाल लाहोटी, दीपक साळुंखे, सदाशिव हासे, अकोले शहरप्रमुख नितीन नाईकवाडी, माधवराव तितमे, संदेश एखंडे, राहुल लांडे , माधव फुलमाळी, भीमा अनाप आणि इतर युवासैनिक, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार शिवसेना संगमनेर तालुका संघटक राजू सातपुते यांनी मानले. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली.

युवासेनेबद्दल माहिती

युवासेना ही शिवसेनेची युवा शाखा आहे. युवासेनेचे मुख्यालय मुंबई येथे आहे.

युवासेनेचा उद्देश महाराष्ट्रातील तरुणांना शिवसेनेच्या विचारसरणीशी जोडणे आणि त्यांना राजकारणात सक्रिय करणे हा आहे. युवासेनेच्या धोरणात प्रामुख्याने मराठी भाषा, मराठी संस्कृती, महाराष्ट्र राज्याचा विकास, आणि राष्ट्रवाद यांचा समावेश होतो.

युवासेनेने महाराष्ट्रातील अनेक आंदोलने आणि चळवळीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यामध्ये मराठी भाषा कायदा, मराठी भाषेचा वापर, महाराष्ट्रातील बेरोजगारी, आणि महाराष्ट्रातील विकास यांचा समावेश होतो.

युवासेनेचे काही प्रमुख नेते खालीलप्रमाणे आहेत:

आदित्य ठाकरे (युवासेनेचे अध्यक्ष)
अनिल परब (युवासेनेचे नेते)
सचिन अहिर (युवासेनेचे प्रवक्ते)
विनायक राऊत (युवासेनेचे मंत्री)
युवासेना ही महाराष्ट्रातील एक प्रभावी राजकीय संघटना आहे. संघटनेने महाराष्ट्रातील राजकारणावर लक्षणीय प्रभाव पाडला आहे.

युवासेनेच्या काही प्रमुख कामगिरी खालीलप्रमाणे आहेत:

मराठी भाषा कायदा: युवासेनेने मराठी भाषा कायदा पारित करण्यासाठी अनेक आंदोलने केली. या आंदोलनांच्या परिणामी १९६८ मध्ये महाराष्ट्र विधानसभेने मराठी भाषा कायदा पारित केला.
मराठी भाषेचा वापर: युवासेनेने महाराष्ट्रातील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा वापर करण्यासाठी अनेक आंदोलने केली. या आंदोलनांच्या परिणामी महाराष्ट्रातील बहुतेक सरकारी कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा वापर केला जातो.
महाराष्ट्रातील बेरोजगारी: युवासेनेने महाराष्ट्रातील बेरोजगारीच्या समस्येवर लक्ष वेधण्यासाठी अनेक आंदोलने केली. या आंदोलनांच्या परिणामी महाराष्ट्र सरकारने बेरोजगारीमुक्त महाराष्ट्र योजनेची सुरुवात केली.
महाराष्ट्रातील विकास: युवासेनेने महाराष्ट्रातील विकासासाठी अनेक चळवळी केल्या. या चळवळींच्या परिणामी महाराष्ट्र सरकारने अनेक विकासात्मक योजनांची अंमलबजावणी केली.
युवासेनेच्या कार्यात काही विवादही आहेत. युवासेनेने अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. यामुळे संघटनेवर टीकाही झाली आहे.

आदित्य ठाकरेंची राजकीय कारकीर्द

आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रातील राजकारणी असून युवासेना या शिवसेनेच्या युवा संघटनेचे प्रमुख आहेत. तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यटन तथा पर्यावरण, वातावरणीय बदल, व राजशिष्टाचार खात्याचे मंत्री होते.

आदित्य ठाकरे यांचा जन्म १३ जून, १९९० रोजी मुंबईत झाला. त्यांचे वडील उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री आहेत. त्यांचे आजोबा बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री होते.

आदित्य ठाकरे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात २०१० मध्ये युवासेनेतून केली. ते २०१५ मध्ये युवासेनेचे अध्यक्ष झाले.

आदित्य ठाकरे यांनी आपल्या कार्यकाळात युवासेनेला नवीन उंचीवर नेले. त्यांनी युवासेनेच्या कार्यात नवीन आयाम जोडले. त्यांनी युवासेनेला एक आधुनिक आणि लोकप्रिय राजकीय पक्ष बनवले.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी मुंबई उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजयी झाले. त्यांनी पर्यटन तथा पर्यावरण, वातावरणीय बदल, व राजशिष्टाचार या खात्यांचे मंत्रीपद भूषवले.

आदित्य ठाकरे हे एक प्रभावी आणि लोकप्रिय राजकीय नेते आहेत. ते आपल्या वक्तृत्व आणि नेतृत्व कौशल्यांसाठी ओळखले जातात. ते एक नवीन पिढीतील राजकारणी आहेत ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन अध्याय सुरू केला आहे.

आदित्य ठाकरे यांच्या राजकीय कारकिर्दीच्या काही प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:

    • २०१० मध्ये युवासेनेत प्रवेश.
    • २०१५ मध्ये युवासेनेचे अध्यक्ष.
    • २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई उत्तर मतदारसंघातून निवडून येणे.
    • पर्यटन तथा पर्यावरण, वातावरणीय बदल, व राजशिष्टाचार या खात्यांचे मंत्रीपद.
    • युवासेनेला एक आधुनिक आणि लोकप्रिय राजकीय पक्ष बनवणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *