विश्वकर्मा योजना काय आहे? PM विश्वकर्मा योजना नोंदणी, व्याजदर, फायदे आणि पात्रता

विश्वकर्मा योजना
पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेअंतर्गत (PM Vishwakarma Yojana) आतापर्यंत १ कोटी ८५ लाख (एप्रिल २०२४) पेक्षा जास्त लोकांनी अर्ज केले आहेत. या योजनेंतर्गत केंद्र सरकार केवळ ५ टक्के व्याजदराने ३ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची सुविधा देत आहे. सन २०२७-२०२८ पर्यंत सुरू राहणाऱ्या पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही आपण राज करू शकतो. ऑनलाइन नोंदणीसाठी तुम्ही https://pmvishwakarma.gov.in या साइटला भेट देऊ शकता. PM विश्वकर्मा योजना २०२४ साठी कोण पात्र आहे, कोणती कागदपत्रे आवश्यक असतील आणि अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे, कर्जावरील व्याजदर काय आहे याबद्दलची सर्व माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

PM Vishwakarma Yojana 2024

योजनेचे नाव – पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना
योजनेची सुरुवात – सप्टेंबर २०२३
योजनेचा लाभ – ५ % व्याज दराने ३ लाख रुपये पर्यंतचे कर्ज, कारागिरांना प्रक्षिक्षणाची सुविधा ई.
योजनेचा उद्देश – कारागीरांना कुशलतेने आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत करणे.
हेल्पलाइन नंबर – 18002677777, 17923
वेबसाइट – https://pmvishwakarma.gov.in

PM विश्वकर्मा योजना काय आहे? (PM Vishwakarma Yojana)

पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना किंवा विश्वकर्मा श्रम सन्मान योजना ही केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक आहे. या योजनेसाठी १३,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पीएम विश्वकर्मा योजने अंतर्गत समाविष्ट कारागीर, कामगार इत्यादींना पीएम विश्वकर्मा योजनेचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र प्रदान केले जाईल. यासाठी नोंदणी मोफत आहे.

या योजनेत नोंदणी करणाऱ्या अर्जदारांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रक्षिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते कमी व्याजदरात कर्जही घेऊ शकतील. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर अर्जदारांना १५,००० रुपये टूल्स खरेदीसाठी दिले जातील. याशिवाय पहिले १ लाख रुपये ५ टक्के व्याजाने दिले जातील, त्यानंतर गरज पडल्यास २ लाख रुपयांचे कर्ज दुसऱ्या हप्त्यात दिले जाईल.

पीएम विश्वकर्मा सन्मान योजना कोणासाठी आहे?

पीएम विश्वकर्मा योजनेसाठी अर्जदार हा भारताचा नागरिक असणे गरजेचे आहे. अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त आणि ५० वर्षांपेक्षा कमी असावे. सरकारी सेवेत काम करणारे लोक या योजनेसाठी पात्र असणार नाहीत. विश्वकर्मा योजना ही योजना देशाच्या ग्रामीण आणि शहरी भागातील हस्त-कलाकार आणि कारागिरांना मदत करेल. पीएम विश्वकर्मा सन्मान योजनेच्या पहिल्या टप्प्यात पुढील १८ पारंपरिक उद्योगांचा समावेश केला आहे.

 1. सुतार
 2. होडी बांधणी कारागीर
 3. चिलखत बनवणारे कारागीर
 4. लोहार
 5. हातोडी आणि अवजार संच बनवणारे कामगार
 6. कुलूप बनवणारे
 7. सोनार
 8. कुंभार
 9. शिल्पकार – मूर्तिकार, दगडी कोरीव काम , पाथरवट- दगड फोडणारे
 10. चर्मकार (पादत्राणे बनवणारे कारागीर)
 11. मिस्तरी
 12. टोपल्या/चटया /झाडू ई. बनवणारे कारागीर
 13. बाहुल्या आणि खेळणी (पारंपरिक) बनवणारे
 14. न्हावी (केश कर्तनकार)
 15. फुलांचे हार बनवणारे कारागीर
 16. परीट (धोबी)
 17. शिंपी आणि
 18. मासेमारीचे जाळे विणणारे.

पीएम विश्वकर्मा योजनेच्या पात्रता आणि अटी –

 1. वर दिलेल्या १८ पारंपारिक व्यवसायांपैकी कोणत्याही व्यवसायात काम करणारे कामगार या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
 2. नोंदणीच्या वेळी अर्जदाराचे वय १८ वर्षे पूर्ण असावे.
 3. अर्जदाराने गेल्या ५ वर्षांमध्ये स्वयंरोजगार किंवा व्यवसाय विकासासाठी PM स्वानिधी, PMEGP, मुद्रा यांसारख्या केंद्र/राज्य-आधारित योजनांअंतर्गत कर्ज घेतलेले नसावे. जर अर्जदाराने त्याच्या/तिच्या मुद्रा आणि स्वानिधी कर्जाची पूर्ण परतफेड केली असेल, तर ते पीएम विश्वकर्मा अंतर्गत कर्जासाठी अर्ज करू शकतात.
 4. कोणत्याही सरकारी सेवेत (केंद्र/राज्य) काम करणारे अर्जदार आणि त्याचे/तिचे कुटुंबातील सदस्य (पती / पत्नी आणि त्यांची अविवाहित मुले) या योजनेसाठी पात्र नाहीत.
 5. या योजनेसाठी नोंदणी आणि लाभ कुटुंबातील फक्त एका सदस्यालाच मिळतील.

हे हि वाचा – गुढीपाडवा का साजरा करतात ? गुढीपाडवा २०२४; जाणून घ्या तारीख आणि मुहूर्त

PM विश्वकर्मा योजनेचे व्याजदर –

या योजनेंतर्गत लोकांना सवलतीच्या व्याजदरात कर्ज दिले जाईल. यासाठी ५ टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात लोकांना १ लाख रुपयांचे कर्ज दिले जाईल आणि दुसऱ्या टप्प्यात २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेता येईल.

वार्षिक व्याजदर – ५ %
कर्जाची रक्कम – ३ लाख रुपयांपर्यंत
कर्जाची मुदत – ४ वर्षांपर्यंत

पीएम विश्वकर्मा योजना: कर्जाची रक्कम आणि परतफेडीचा कालावधी

या योजने अंतर्गत अर्ज करणारे लोक एकूण ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकतात. पहिल्यांदा आपल्याला १ लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते ज्याचा परतफेडीचा कालावधी १८ महिन्यांचा आहे.

कर्जाचे टप्पे        कर्जाची रक्कम      परतफेड कालावधी

पहिला टप्पा       १ लाख                   १८ महिन्यांपर्यंत

दुसरा टप्पा        २ लाख                   ३० महिन्यांपर्यंत

पीएम विश्वकर्मा योजनेचे फायदे

 1. पीएम विश्वकर्मा श्रम सन्मान योजनेचा मुख्य उद्देश कारागिरांना कौशल्य आणि आर्थिक मदत प्रदान करणे हा आहे.
 2. यामध्ये अर्जदारांना तालुका किंवा जिल्हा मुख्यालयात असलेल्या लघू व मध्यम उद्योग विभागात प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.
 3. योजनेंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या कारागिरांना आर्थिक मदत देण्याची तरतूद आहे.
 4. या योजनेंतर्गत अर्जदारांना ५०० रुपये प्रतिदिन भत्ता देण्याची तरतूद आहे. तसेच ५ दिवस कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे.
 5. टूलकिट प्रोत्साहन म्हणून १५,००० रुपये अनुदान देण्याची सुविधा आहे.

पीएम विश्वकर्मा योजने साठी ऑनलाइन नोंदणी कशी करावी?

पीएम विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला खालील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील:

PM Vishwarkarma Yojana Website

 1. त्यानंतर तुम्हाला How to Register या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
 2. तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.
 3. आता नोंदणीसाठी तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड नंबर टाकावा लागेल.
 4. यानंतर तुम्हाला व्हेरिफिकेशन ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
 5. तुमचा नोंदणी फॉर्म उघडेल.
 6. तुम्हाला तुमच्या फॉर्ममध्ये विचारलेली माहिती योग्यरित्या प्रविष्ट करावी लागेल.
 7. तुम्हाला तुमची सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
 8. यानंतर तुम्हाला सबमिट ऑप्शनवर क्लिक करावे लागेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *