साईबाबांच्या शिर्डीत रामनवमीचा उत्साह, भक्तांसाठी रात्रभर खुले राहणार साई मंदिर.

साईबाबा आणि रामनवमी
देशभरात रामनवमीचा सण 17 एप्रिल रोजी साजरा होत असून साईबाबांच्या शिर्डी नगरीतही रामनवमीची (Ram Navami in Shirdi) धामधूम सुरू आहे. शिर्डी मध्ये मोठ्या उत्साहात रामनवमीचा सण साजरा केला जातो. 17 एप्रिल रोजी रामनवमीच्या दिवशी शिर्डीचे साईबाबा मंदिर हे भाविकांसाठी रात्रभर खुले राहणार असल्याची माहिती साईबाबा संस्थानने दिली आहे. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी रामनवमीच्या दिवशी साईबाबा मंदिर हे भक्तांसाठी रात्रभर उघडे राहणार असल्याची माहिती दिली आहे.

साईबाबा संस्थानच्या वतीने शिर्डीत 16 ते 18 एप्रिल या दिवसांत रामनवमीच्या उत्सवाचे आयोजन केले आहे. यावर्षी 113 वा राम नवमी महोत्सव शिर्डीमध्ये साजरा होत आहे. संस्थांनी याची जोरदार तयारी केली असून या तीन दिवसांत शिर्डीमध्ये लाखो भाविक दर्शनासाठी येतील असा अंदाज आहे. महाराष्ट्रसह संपूर्ण देशभरातून रामनवमीच्या दिवशी शिर्डीमध्ये लाखो साई भक्त येत असतात. साईबाबा संस्थानने येणाऱ्या भाविकांसाठी राहण्याची, जेवणाची तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे अशी माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे.

साईबाबा समाधी मंदिर शिर्डी
साईबाबा समाधी मंदिर शिर्डी

शिर्डी आणि रामनवमीचे नाते काय?

साईबाबा संस्थान शिर्डी कडून दरवर्षी रामनवमीचा उत्सव त्या जल्लोषात साजरा केला जातो. या उत्सवाची परंपरा अनेक वर्ष जुनी असून खुद्द साहेबांनी शिर्डीत रामनवमी महोत्सवाची सुरुवात केली होती अशी माहिती आहे. रामनवमीच्या दिवशी शिर्डीत देशभरातून अनेक पायी दिंडी साईबाबांची पालखी घेऊन येत असतात. मुंबई आणि उपनगरातून जवळपास 100 ते 150 पालख्या शिर्डीत येत असतात. रामनवमीच्या उत्साहात शिर्डीतील गावकरी मोठ्या आनंदाने सहभागी होत असतात. शिर्डीतील प्रत्येक घरी आणि रस्त्यांवरही रांगोळ्या काढून आकर्षक सजावट शिर्डी नगरीत केली जाते. शिर्डी हे देशातील दोन नंबरचे श्रीमंत देवस्थान असून वर्षभरात लाखो भाविक शिर्डीला भेट देत असतात.

हे हि वाचा – राम नवमी 2024: रामनवमी का साजरी केली जाते? पूजेचा शुभ मुहूर्त, योग्य पूजा पद्धत आणि रामनवमीचे महत्त्व

शिर्डीतील रामनवमी उत्सव आणि परंपरा:

शिर्डीतील रामनवमी उत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध उत्सवांपैकी एक आहे. लाखो भाविक या उत्सवात सहभागी होतात आणि साईबाबांचे दर्शन घेतात.

साईबाबांचा जन्म: श्री साईबाबा यांचा जन्म चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीलाच झाला होता, ज्या दिवशी रामनवमी साजरी केली जाते. त्यामुळे शिर्डीत रामनवमी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

साईबाबा समाधी मंदिरात विशेष पूजा: रामनवमीनिमित्त साईबाबा समाधी मंदिरात विशेष पूजा आणि आरती आयोजित केल्या जातात.

भंडारा आणि दान: या दिवशी अनेक भक्त भंडारा आयोजित करतात आणि गरजूंना दान देतात.

यावर्षीच्या रामनवमी सोहळ्याची जय्यत तयारी साईबाबा संस्थान शिर्डीच्या वतीने केली आहे. भाविकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची पुरेपूर काळजी संस्थानने घेतली असल्याची माहिती संस्थांचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे. 17 एप्रिल रोजी साईबाबांचे मंदिर रात्रभर दर्शनासाठी फुले असणार आहे त्यामुळे साई भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *