राम नवमी 2024: रामनवमी का साजरी केली जाते? पूजेचा शुभ मुहूर्त, योग्य पूजा पद्धत आणि रामनवमीचे महत्त्व

राम नवमी मराठी माहिती

राम नवमी 2024 (Ram Navmi 2024) : रामनवमीचा दिवस हा मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामाची पूजा करण्यासाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो. यावर्षी १७ एप्रिल २०२४ रोजी श्रीराम नवमीचा सण साजरा होत आहे.

सनातन हिंदू धर्मात प्रभू रामांना मर्यादा पुरुषोत्तम ही पदवी देण्यात आली आहे. यामुळेच रामनवमी हा सण हिंदू धर्मीयांसाठी खूप खास समजला जातो. हिंदू धर्मात रामनवमीचे महत्व मोठे आहे. वैदिक दिनदर्शिकेनुसार, रामनवमी हा सण दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला साजरा केला जातो. यावर्षी देशभरात १७ एप्रिल २०२४ रोजी रामनवमी साजरी होत आहे. या दिवशी विधीनुसार शुभ मुहूर्तावर प्रभू रामाची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात. जाणून घेऊया रामनवमीचा शुभ मुहूर्त, पूजेची पद्धत आणि त्याचे महत्त्व.

राम नवमी कधी आहे? ( राम नवमी २०२४)

महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी १६ एप्रिल रोजी दुपारी १:२३ पासून सुरू होत असून ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच १७ एप्रिल रोजी दुपारी ३:१५ वाजता संपेल. उदयतिथीनुसार, १७ एप्रिल २०२४ रोजी रामनवमीचा सण साजरा देशभरात साजरा होणार आहे.

राम नवमी 2024 चा शुभ मुहूर्त

यावर्षी भगवान श्रीरामाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त १७ एप्रिल रोजी सकाळी ११.०३ ते दुपारी ०१:३८ पर्यंत असेल. प्रभू रामाची पूजा करण्यासाठी भक्तांना २ तास ३५ मिनिटे वेळ मिळणार आहे.

रामनवमीची पूजा कशी करावी?

  1. रामनवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ कपडे घालावे.
  2. त्यानंतर पूजेची जागा स्वच्छ करावी.
  3. यानंतर प्रभू श्रीरामाची पूजा सुरू करावी.
  4. भगवान श्रीराम, सीता माता, श्री लक्ष्मण आणि भगवान हनुमान यांच्या मूर्ती स्वच्छ कपड्यावर ठेवाव्या.
  5. यानंतर षोडशोपचार पद्धतीने चंदन, धूप, फुले, हार, अत्तर इत्यादींनी एक एक करून सर्वांची पूजा करावी.
  6. आता भगवान रामाच्या पूजेमध्ये जल अर्पण करा. कमळ आणि तुळशीची पाने देखील आपण अर्पण करू शकता. याशिवाय दोन-तीन प्रकारची फळे, मिठाई आणि फुले प्रभू श्रीरामाच्या चरणी अर्पण करा.
  7. आता रामायण, रामचरितमानस आणि रामरक्षास्तोत्र ई. चे पठण करावे.
  8. शेवटी भगवान श्रीराम, माता सीता, लक्ष्मण आणि हनुमानजींची आरती करा.
  9. पूजेनंतर सर्व प्रसादाचे वाटप करावे.

राम नवमी का साजरी केली जाते?

दरवर्षी रामनवमी हा सण हिंदू धर्मात धर्मात मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. धार्मिक ग्रंथानुसार भगवान श्रीराम यांचा जन्म याच दिवशी झाला होता. अयोध्येचा राजा दशरथ यांच्या घरी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला भगवान रामाचा जन्म झाला. रावणाचा वध करण्यासाठी रामाचा जन्म झाला असे मानले जाते. राम जन्माचा दिवस देशभरात श्रीराम नवमी म्हणून साजरा केला जातो.

भगवान श्री विष्णूचा सातवा अवतार म्हणजे श्रीराम आहे. भगवान राम आदर्श पुरुष, पुत्र, पती आणि राजा म्हणून ओळखले जातात. त्यांचे जीवन आदर्श आणि नीतिमत्तेचे प्रतीक आहे आणि राम नवमी हा दिवस त्यांच्या सद्गुणांचे स्मरण करण्याचा आहे. अनेक रामभक्त राम नवमीच्या दिवशी नवीन संकल्प करतात आणि शुभ कार्याची सुरुवात करतात.

हे हि वाचा – विश्वकर्मा योजना काय आहे? PM विश्वकर्मा योजना नोंदणी, व्याजदर, फायदे आणि पात्रता

रामनवमीच्या दिवशी करा या गोष्टी

श्रीराम जय राम जय जय राम सारखे भजन म्हणा.
ध्यानधारणा किंवा प्रार्थना करा. श्रीरामाचा जप करा.
गरजू लोकांना दान करा.
लहान मुलांना भगवान रामाची कथा सांगा आणि त्यांना त्यांच्या आदर्शांबद्दल शिकवा.

देशातील काही प्रसिद्ध राम मंदिरे

रामनवमीच्या दिवशी तुम्ही देशातील काही महत्वाच्या राम मंदिरांना भेट देऊन संनवमी साजरी करू शकता.

अयोध्येतील राम मंदिर: हे मंदिर भगवान रामाचे जन्मस्थान मानले जाते आणि ते भारतातील सर्वात पवित्र आणि सर्वात जास्त भेट दिलेले हिंदू मंदिरांपैकी एक आहे. रामनवमीच्या दिसव्ही अयोध्यानगरी सजली जाते आणि लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात.

रामेश्वरम मंदिर, तमिळनाडु: हे मंदिर भगवान श्रीरामाने रावणाशी लढाई जिंकण्यासाठी बांधलेल्या सेतुबंधनाच्या दक्षिण टोकावर आहे.

बीरला मंदिर, दिल्ली: हे मंदिर भगवान राम-सीता आणि लक्ष्मण यांना समर्पित आहे आणि ते त्याच्या सुंदर वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे.

काळाराम मंदिर नाशिक – नाशिकच्या काळाराम मंदिरात आपण जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊ शकता. नाशिकच्या पंचवटी भागात काळाराम मंदिर असून प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीता माता यांचे वनवासाच्या काळात या ठिकाणी वास्तव्य होते असे सांगतात.

टीप – वरील सर्व माहिती हि धार्मिक ग्रंथ आणि पुराणांतून घेतली असून आपण आपल्या श्रेद्धेप्रमाणे श्रीराम नवमी साजरी करू शकता. वरील माहितीतून कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा MahaReport चा हेतू नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *