नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे आज प्रथमच एका व्यासपीठावर

नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर

नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे आज प्रथमच एका व्यासपीठावर

लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा म्हणजेच पाचवा टप्पा 20 तारखेला होणार असून प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. आज 17 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर या ठिकाणी सभा होत असून सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज पार्क म्हणजेच शिवतीर्थ या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज शुक्रवार दिनांक 17 मे रोजी सभा होत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे या सभेला उपस्थित असणार आहेत. राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रथमच एका व्यासपीठावर येत असून राज ठाकरे या सभेत काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

राज ठाकरेंचे भाषण सुरुवातीलाच होणार

दरम्यान या सभेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जवळपास सर्व मंत्री आमदार खासदार उपस्थित राहणार आहेत. शासकीय फोटो कॉल नुसार राज ठाकरे यांचे भाषण सर्वप्रथम होण्याची शक्यता आहे.

नरेंद्र मोदी बाळासाहेबांना करणार अभिवादन

मुंबईत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिवतीर्थावरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकास अभिवादन करणार असून तेथून जवळच असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात जाऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन करणार आहेत तसेच चैत्यभूमी येथे जाऊन नरेंद्र मोदी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणार असल्याची माहिती मिळत आहे.

मोदींच्या स्वागतासाठी शिवाजी पार्क सज्ज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य सभा शिवतीर्थावर आज होणार असून या सभेची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. अनेक ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागताचे बॅनर लावले असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेही वीस फुटांचे मोठे बॅनर लावण्यात आले आहेत. मुंबईत आज मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून शिवाजी पार्क परिसरातील वाहतुकीत मोठ्या प्रमाणावर बदल केला आहे. आज या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणावर टीका करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे हि वाचा – अक्षय तृतीया म्हणजे काय? अक्षय तृतीया का साजरी केली जाते? जाणून घ्या अक्षय तृतीया २०२४ चा मुहूर्त

अजित पवार नाराज?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील रोड शोला उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित होते. त्यांना घशाच्या संसर्ग झाल्यामुळे ते नव्हते उपस्थित नव्हते अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पत्रक काढून दिली होती त्यामुळे आज होणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या सभेला अजित पवार उपस्थित असणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दादर परिसरातील वाहतुकीत बदल –

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर दादर परिसरात वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. दादर परिसरात अनेक ठिकाणी वाहनांसाठी नो
पार्किंग झोन असणार आहे. शुक्रवार १७ मे रोजी दादरमधील अनेक रस्ते गरजेनुसार वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. सावरकर मार्ग, केळुस्कर रोड, केळकर मार्ग या रस्त्यावर वाहनांचे पार्किंग करता येणार नाही. मोदींच्या सभेसाठी येणाऱ्या वाहनांसाठी देखील विशेष पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज जाहीर सभा शिवतीर्थ (छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर ) येथे होणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. दादर आणि माटुंगा परिसरातील तब्बल ३० ठिकाणी नो पार्किंग झोन ठेवण्यात आले आहे. सकाळी १० ते रात्री १० पर्यंत दादर आणि माटुंगा परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. शिवाजी पार्कच्या संपूर्ण परिसर आज सकाळी १० वाजेनंतर झिरो पार्किंग करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना पर्यायी वाहतूक मार्गांचा विचार करून बाहेर पडावे असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *