Maharashtra Loksabha Winner : महाराष्ट्रातून निवडून आलेल्या 48 खासदारांची यादी

महाराष्ट्रातील खासदारांची यादी
Maharashtra Loksabha Election Result -2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवले असून महायुतीचा दारुण पराभव झाला आहे. 48 पैकी महाविकास आघाडीने तब्बल 30 जागा जिंकल्या असून महायुतीला मात्र फक्त 17 जागांवर समाधान मानावे लागले आहे. सांगलीतून अपक्ष विशाल पाटील यांनी बाजी मारली असून राज्यातील ते अपक्ष निवडून येणारे एकमेव खासदार आहेत. या लेखात आपण जाणून घेऊया महाराष्ट्रातील 48  खासदारांची यादी.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(शरदचंद्र पवार) आणि काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून राज्यात 2024 च्या लोकसभा निवडणुका महाविकास आघाडीच्या छत्राखाली लढवल्या. ठाकरे गटाने राज्यात सर्वाधिक 21 जागा लढवल्या होत्या त्यापैकी त्यांना 9 जागांवर विजय मिळवता आला आहे. काँग्रेसने 17 जागा लढवून 13 जागांवर विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीत सर्वात कमी म्हणजे 10 जागा लढवल्या होत्या त्यापैकी त्यांनी 8 जागांवर विजय मिळवला आहे. सांगलीतून अपक्ष विशाल पाटील यांनी विजय मिळवला असून त्यांनी भाजपच्या संजय काका पाटील आणि उद्धव ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटील यांचा पराभव केला आहे.

भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट)यांनी महायुती म्हणून एकत्रित निवडणुका लढवल्या. भाजपने राज्यात सर्वाधिक 28 जागा लढवल्या त्यापैकी त्यांनी 9 जागांवर विजय मिळवला आहे. त्यापाठोपाठ शिंदे गटाने 15 जागा लढवत 7 जागांवर विजय मिळवला आहे. महायुतीत अजित पवार गटाने सर्वात कमी म्हणजे चार जागा लढवल्या होत्या त्यापैकी त्यांना फक्त एका जागेवर विजय मिळवता आला आहे.

जाणून घेऊया महाराष्ट्रातील 48 मतदार संघातून निवडून आलेल्या खासदारांची यादी –

हे हि वाचा – ..म्हणून दादा कोंडकेंनी नाकारले मंत्रिपद.

लोकसभा मतदारसंघ विजयी उमदेवार (मते) पराभूत उमेदवार (मते)
अहमदनगर निलेश लंके (6,24,797) सुजय विखे पाटील (5,95,868)
अकोला अनुप धोत्रे (4,57,030) अभय पाटील (4,16,404)
अमरावती बळवंत वानखडे (5,26,271) नवनीत राणा (5,06,540)
औरंगाबाद संदीपान भुमरे (4,76,130) इम्तियाज जलील (3,41,480)
बारामती सुप्रिया सुळे (7,32,312) सुनेत्रा पवार (5,73,979)
बीड बजरंग सोनवणे (6,83,950) पंकजा मुंडे (6,77,397)
भंडारा गोंदिया प्रशांत पडोळे (5,87,413) सुनील मेंढे (5,50,033)
भिवंडी सुरेश म्हात्रे (4,99,464) कपिल पाटील (4,33,343)
बुलढाणा प्रतापराव जाधव (3,49,867) नरेंद्र खेडेकर (3,20,388)
चंद्रपूर प्रतिभा धानोरकर (7,18,410) सुधीर मुनगंटीवार (4,58,004)
धुळे शोभा बच्छाव (5,83,866) सुभाष भामरे (5,80,035)
दिंडोरी भास्कर भगरे (5,77,339) भारती पवार (4,64,140)
गडचिरोली नामदेव किरसान (6,17,792) अशोक नेते (4,76,096)
हातकणंगले धैर्यशील माने (5,20,190) सत्यजित पाटील (5,06,764)
हिंगोली नागेश पाटील आष्टीकर (4,92,535) बाबुराव कदम (3,83,933)
जळगाव स्मिता वाघ (6,74,428) करण पवार (4,22,834)
जालना कल्याण काळे (6,07,897) रावसाहेब दानवे (4,97,939)
कल्याण श्रीकांत शिंदे (5,89,636) वैशाली दरेकर (3,80,492)
कोल्हापूर छत्रपती शाहू (7,54,522) संजय मंडलिक (5,99,558)
लातूर शिवाजी काळगे (6,09,021) सुधीर श्रृंगारे (5,47,140)
माढा धैर्यशील मोहिते पाटील (6,22,213) रणजितसिंह नाईक निंबाळकर (5,01,376)
मावळ श्रीरंग बारणे (6,92,832) संजोग वाघेरे (5,96,217)
उत्तर मुंबई पीयूष गोयल (6,80,146) भूषण पाटील (3,22,538)
उत्तर मध्य मुंबई वर्षा गायकवाड (4,45,545) उज्ज्वल निकम (4,29,031)
उत्तर पूर्व मुंबई संजय दिना पाटील (4,50,937) मिहीर कोटेचा (4,21,076)
उत्तर पश्चिम मुंबई रवींद्र वायकर (4,52,644) अमोल कीर्तिकर (4,52,596)
दक्षिण मुंबई अरविंद सावंत (3,95,655) यामिनी जाधव (3,42,982)
दक्षिण मध्य मुंबई अनिल देसाई (3,95,138) राहुल शेवाळे (3,41,754)
नागपूर नितीन गडकरी (6,55,027) विकास ठाकरे (5,17,424)
नांदेड वसंतराव चव्हाण (5,28,894) प्रतापराव चिखलीकर (4,69,452)
नंदूरबार गोवाल पाडवी (7,45,998) हिना गावित (5,86,878)
नाशिक राजाभाऊ वाजे (6,16,729) हेमंत गोडसे (4,54,728)
उस्मानाबाद ओमराजे निंबाळकर (7,48,752) अर्चना पाटील (4,18,906)
पालघर हेमंत सावरा (6,01,244) भारती कामडी (4,17,938)
परभणी संजय जाधव (6,01,343) महादेव जानकर (4,67,282)
पुणे मुरलीधर मोहोळ (5,84,728) रवींद्र धंगेकर (4,61,690)
रायगड सुनील तटकरे (5,08,352) अनंत गीते (4,25,568)
रामटेक श्यामकुमार बर्वे (6,13,025) राजू पारवे (5,36,257)
रत्नागिरी सिंधुदुर्ग नारायण राणे (4,48,514) विनायक राऊत (4,00,656)
रावेर रक्षा खडसे (6,30,879) श्रीराम पाटील (3,58,696)
सांगली विशाल पाटील (5,71,666) संजयकाका पाटील (4,71,613)
सातारा उदयनराजे भोसले (5,71,134) शशिकांत शिंदे (5,38,363)
शिर्डी भाऊसाहेब वाकचौरे (4,76,900) सदाशिव लोखंडे (4,26,371)
शिरूर अमोल कोल्हे (6,98,692) शिवाजीराव आढळराव पाटील (5,57,741)
सोलापूर प्रणिती शिंदे (6,20,225) राम सातपुते (5,46,028)
ठाणे नरेश म्हस्के (7,34,231) राजन विचारे (5,17,220)
वर्धा अमर काळे (5,33,106) रामदास तडस (4,51,458)
यवतमाळ वाशिम संजय देशमुख (5,94,807) राजश्री पाटील (5,00,334)

राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार?

या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता असून अजित पवार गटाने लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार करण्याची मागणी केली आहे तसेच महामंडळाचे वाटप लवकरात लवकर करावे अशी मागणी ही अजित पवार गटाच्या आमदारांनी पवारांकडे केली आहे. अजित पवार सरकारमध्ये येऊन एक वर्ष झाले तरीही अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झाला नसल्याने अजित पवार गटातील काही आमदार तसेच शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याचे देखील चर्चा आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होतोय हे बघणे महत्त्वाचे ठरेल.

देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार?

दरम्यान माध्यमांशी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाचे संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे. तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी मला मोकळे करावे अशा आशयाची मागणी त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. पक्ष बांधणीसाठी आणि संघटनेसाठी काम करण्याची इच्छा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले असल्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठी देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा स्वीकारणार का हे बघावे लागेल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *