गुढीपाडवा का साजरा करतात ? गुढीपाडवा २०२४; जाणून घ्या तारीख आणि मुहूर्त

गुढीपाडवा का साजरा करतात
गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील नववर्षाचा दिवस आहे. हा दिवस चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो. हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्याच्या दिवसाने होते. गुढीपाडवा हा सण साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो.

गुढीपाडवा 2024 कधी आहे?

हिंदू दिनदर्शिकेनुसार, चैत्र महिन्याची प्रतिपदा ८ एप्रिल रोजी रात्री ११:५० वाजता सुरू होत असून ९ एप्रिल रोजी रात्री ८:३० वाजता समाप्त होत आहे. त्यामुळे २०२४ या वर्षी गुढीपाडव्याचा सण मंगळवारी ९ एप्रिल रोजी साजरा होणार आहे.

गुढीपाडव्याचे महत्त्व काय आहे?

नववर्षाचा प्रारंभ: गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील नववर्षाचा दिवस आहे. चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी हा दिवस साजरा केला जातो. मराठी नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते.

विजयाचे प्रतीक: गुढी हे विजयाचे प्रतीक आहे. भगवान श्रीराम यांनी रावणावर विजय मिळवला तेव्हा त्या दिवसापासून गुढीपाडवा साजरा केला जातो असे मानले जाते.

नवीन सुरुवात: गुढीपाडव्याला अनेक लोक नवीन व्यवसाय सुरू करतात, नवीन गोष्टी शिकण्यास सुरुवात करतात आणि नवीन उद्दिष्टे ठरवतात. घरात नवीन वस्तूंची खरेदी केली जाते . गाडी , सोने यासारख्या वस्तूंची खरेदी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर केली जाते.

सामाजिक बंध: लोक एकमेकांना घरी आमंत्रित करतात, मिठाई वाटतात आणि नवीन वर्षाच्या एकमेकांना शुभेच्छा देतात.

सांस्कृतिक महत्त्व: गुढीपाडवा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. या दिवशी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यामध्ये गायन, नृत्य आणि नाटकांचा समावेश आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशी शोभायात्रा काढल्या जातात.

धार्मिक महत्त्व: गुढीपाडव्याला धार्मिक महत्त्व देखील आहे. या दिवशी लोक ब्रम्हदेवाची पूजा करतात आणि नवीन वर्षासाठी त्यांचे आशीर्वाद घेतात.

पर्यावरणीय महत्त्व: गुढीपाडव्याला पर्यावरणीय महत्त्व देखील आहे. या दिवशी लोक निसर्गाचे आभार मानतात आणि त्याचे रक्षण करण्याचा संकल्प करतात.

गुढी पाडवा २०२४ शुभ मुहूर्त

ह्या वर्षी ९ एप्रिल २०२४ रोजी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाईल. चैत्र महिन्याची प्रतिपदा तिथी ८ एप्रिल २०२४ रोजी रात्री ११.५० पासून सुरु होईल आणि ९ एप्रिल २०२४ रोजी रात्री ८.३० वाजता समाप्त होईल. गुढीच्या पूजेसाठी सकाळी ०६.०२ ते १०:१६ पर्यंतची वेळ शुभ असेल. या वेळेत आपण गुढी उभारू शकता.

गुढीपाडवा का साजरा करतात?

गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे आणि त्याला पौराणिक दृष्ट्या अनेक महत्त्व आहेत. त्यापैकी काही खालीलप्रमाणे:

सृष्टीची निर्मिती: हिंदू धर्मातील पुराणांनुसार, ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली. त्यामुळे गुढीपाडवा हा नवीन सुरुवातीचा दिवस मानला जातो. ब्रम्हदेवाला सृष्टीचा निर्माता समजले जाते.

भगवान श्रीरामाचा विजय: प्रभू श्रीरामाने रावणावर विजय मिळवला आणि अयोध्येत परत आले तेव्हा त्या दिवसापासून गुढीपाडवा साजरा केला जातो असे मानले जाते. प्रभू श्रीरामांचे अयोध्येत आगमन झाले त्या दिवशी लोकांनी आनंद साजरा करण्यासाठी आपापल्या घरांवर ध्वज फडकावला होता .

शालीवाहन शक: शालीवाहन नावाच्या राजाने हूणांचा पराभव करून शालीवाहन शक सुरू केला. त्या दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदा होती.

इतर पौराणिक कथा: गुढीपाडव्याशी संबंधित अनेक पौराणिक कथा आहेत. एका कथेनुसार, या दिवशी भगवान विष्णू यांनी मत्स्यावतार धारण करून पृथ्वीला जलप्रलयापासून वाचवले. दुसऱ्या कथेनुसार, गुढीपाडव्याच्या दिवशी हनुमानाने सूर्याला ग्रहणापासून मुक्त केले.

हे हि वाचा – होळी का साजरी करतात? जाणून घ्या होळी सणाची संपूर्ण माहिती आणि महत्व

गुढी पाडवा कसा साजरा करतात?

गुढी उभारणे:

सकाळी लवकर उठून, लोक घराबाहेर गुढी उभारतात. गुढी ही एक लांब बांबूची काठी आहे ज्याच्या टोकाशी रंगीबेरंगी कापड बांधलेले असते. गुढीला कडुलिंबाची पाने, फुले लावली जातात. गुढीच्या टोकाला एक कलश उलटा करून अडकवला जातो.

गाठी आणि कडे –

गुढीच्या काठीला साखरेचे कडे आणि गाठी लावली जाते. गुढीपाडव्याच्या आसपास बाजारात साखरेच्या गाठ्या आणि कडे मिळतात.

पूजा:

घराची साफसफाई करून गुढीची पूजा केली जाते आणि गुढीला नैवद्य दाखविला जातो.

नवीन कपडे आणि मिठाई:

लोक नवीन कपडे घालतात आणि मिठाई बनवतात किंवा बाजारातून खरेदी करतात.

गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही करू नका या गोष्टी

नकारात्मक विचार: गुढीपाडव्याच्या दिवशी नकारात्मक विचार टाळणे आवश्यक आहे. या दिवशी सकारात्मक विचार ठेवावा.

वादविवाद: या दिवशी कोणत्याही प्रकारचे वादविवाद किंवा भांडण करू नये. घरातील वातावरण प्रसन्न ठेवावे.

गृहकार्य: शक्यतो, गुढीपाडव्याच्या दिवशी घरकाम टाळावे.

नॉन-व्हेज: गुढीपाडव्याच्या दिवशी आपण मांसाहार टाळावा.

ऋण देणे-घेणे: या दिवशी आपण पैशांची देवाणघेवाण करणे शक्यतो टाळावे.

उशिरा उठणे: सकाळी लवकर उठून, स्नान करून, नवीन कपडे घालणे शुभ मानले जाते.

आमच्या असंख्य वाचकांना मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा.

(टीप – वरील सर्व माहिती विविध धर्म ग्रंथ आणि इतर पौराणिक कथा यातून घेतली असून MahaReport चा अंधश्रद्धा पसरवण्याचा कुठलाही हेतू नाही.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *