पालकांसाठी खुशखबर; आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरु, जाणून घ्या आरटीई बद्दल संपूर्ण माहिती

आरटीई admission information in marathi
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील आरटीई (शिक्षण हक्क कायदा) प्रवेश प्रक्रिया रखडली होती. मात्र आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी प्रक्रिया 16 ते 30 एप्रिल दरम्यान असणार आहे.

आरटीई प्रवेश 2024-25 महाराष्ट्र प्रारंभ तारीख

16 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान आपण आपल्या पाल्याचे आरटीई अंतर्गत प्रवेशाचे फॉर्म भरू शकता.

आरटीई प्रवेश काय आहे?

शिक्षणाचा अधिकार कायदा, 2009 (RTE) हा भारतातील मुलांना मोफत आणि अनिवार्य शिक्षण प्रदान करण्यासाठीचा एक महत्वाचा कायदा आहे. हा कायदा 6 ते 14 वर्षे वयोगटातील सर्व मुलांना सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये प्रवेश मिळवण्याचा अधिकार देतो.

बालकांची किमाल आणि कमाल वयोमर्यादा –

शैक्षणिक वर्ष सन 2024-2025 या वर्षासाठी आर टी ई 25% प्रवेशासाठी बालकांची वयोमर्यादा डिसेंबर 2024 अखेर पुढील प्रमाणे राहील.

१) प्ले ग्रुप किंवा नर्सरी साठी 31 डिसेंबर 2000 रोजी बालकाचे किमान वय ३ वर्ष असणे गरजेचे आहे आणि जास्तीत जास्त वय हे ४ वर्षे ५ महिने आणि ३० दिवसांचे असावे.
२) ज्युनिअर केजी साठी ३१ डिसेंबर २०२४ रोजी बालकाचे किमान वय ४ वर्षे आणि कमाल वय ५ वर्षे ५ महिने आणि 30 दिवस असावे.
३) सिनियर केजी साठी बालकाचे ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत किमान वय ५ वर्षे आणि कमाल वय ६ वर्षे, ५ महिने आणि ३० दिवस असावे.
४) इयत्ता पहिलीसाठी ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत बालकाचे किमान वय हे ६ वर्षे आणि कमाल वय हे ७ वर्षे, ५ महिने आणि 30 दिवसांचे असावे.

हे हि वाचा – राम नवमी 2024: रामनवमी का साजरी केली जाते? पूजेचा शुभ मुहूर्त, योग्य पूजा पद्धत आणि रामनवमीचे महत्त्व

आरटीई 25% ऍडमिशन फॉर्म कसा भरावा-

1) सर्वप्रथम आपण या लिंक वर जावे.

https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/login

rte maharashtra
rte maharashtra

2) या लिंक वर जाऊन न्यू रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर एक फॉर्म ओपन होईल.

3) एकावेळी आपण एकच फॉर्म भरू शकतो. एकदा फॉर्म भरल्यानंतर जन्मतारखेत आपण बदल करू शकत नाही.

4) फॉर्म भरताना जर आपल्याकडून बालकाचे जन्मतारीख किंवा मोबाईल नंबर चुकल्यास आपण तो अर्ज डिलीट करून पुन्हा नवीन अर्ज भरावा.

5) दिव्यांग किंवा अपंग बालकांचा अर्ज भरत असताना पालकांनी Child Disability या ऑप्शन वर क्लिक करावे.

6) सर्वप्रथम आपण ज्या जिल्ह्यातून फॉर्म भरू इच्छित आहात तो जिल्हा निवडावा. त्यानंतर आपल्या बालकाचे प्रथम नाव वडिलांचे नाव आणि आडनाव या फॉर्ममध्ये भरावे. जन्मतारीख आणि मोबाईल नंबर भरून रजिस्ट्रेशन करावे. यानंतर आपल्याला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल आणि आपल्या मोबाईल नंबर वर पासवर्ड पाठवला जाईल. रजिस्ट्रेशन नंबर आपण सेव्ह करून ठेवावा.

7) यानंतर पुन्हा त्याच वेबसाईटवर जाऊन आपल्याला डाव्या बाजूला लॉगिन चा ऑप्शन दिसेल. यात आपण रजिस्ट्रेशन नंबर आणि मोबाईलवर आलेला पासवर्ड टाकून लॉगिन करू शकता. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला पासवर्ड चेंज करण्याचा पर्याय मिळेल. आपण येथून पासवर्ड चेंज करू शकता.

8) यानंतर आपल्या रजिस्ट्रेशन नंबर आणि नवीन पासवर्ड ने आपण लॉगिन करून फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरू शकता.

आर टी इ ऍडमिशन साठी लागणारी कागदपत्रे-

ऍड्रेस प्रूफ, जन्माचा दाखला, हॅंडीकॅप असल्यास सर्टिफिकेट, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला , बालकाचा आधार कार्ड नंबर.

काही दिवसानंतर लॉटरी पद्धतीने मुलांची निवड केली जाते. आपल्या पाल्याचा नंबर लागल्यास आपल्याला मोबाईल नंबर वर मेसेज येतो किंवा आपण वेबसाईटवर जाऊन वेळोवेळी चेक करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *