बुद्ध पौर्णिमा म्हणजे काय? बुद्ध पौर्णिमा का साजरी करतात?

CompressJPEG.online 500x500 image
बुद्ध पौर्णिमा ही बौद्ध धर्मातील सर्वात पवित्र आणि महत्वाचा सण आहे. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी भगवान गौतम बुद्धांचा जन्म, बुद्धांना ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण या तीन महत्त्वपूर्ण घटनांचा स्मरणोत्सव साजरा केला जातो. बौद्ध धर्माव्यतिरिक्त हिंदू धर्मातही बुद्ध पौर्णिमेला महत्व आहे. भगवान बुद्ध हा विष्णूचा ९वा आणि शेवटचा अवतार होता असे मानले जाते.

बुद्ध पौर्णिमा कधी आहे

भगवान गौतम बुद्धांचा जन्म वैशाख महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी झाला. २०२४ या वर्षी ही तारीख गुरुवार दिनांक २३ मे २०२४ रोजी आहे. जगभरात बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत. चीन, जपान, श्रीलंका, दक्षिण कोरिया, बर्मा, थायलंड ही बौद्ध राष्ट्रे म्हणून नावाजलेली आहेत.

बुद्ध पौर्णिमा का साजरी करतात?

 • जन्म:  बुद्ध पौर्णिमेला भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला असे म्हटले जाते. इसवी सण पूर्व ५६३ मध्ये, वैशाख पौर्णिमेच्या दिवशी लुंबिनीच्या जंगलात राणी मायादेवी यांनी गौतम बुद्धांना जन्म दिला.

 • ज्ञानप्राप्ती: वयाच्या ३५ व्या वर्षी, बोधगया येथे एका वटवृक्षाखाली ध्यान करत असताना गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली. या घटनेलाच “बोधिज्ञान” म्हणतात.

 • महापरिनिर्वाण: वयाच्या ८० व्या वर्षी कुशीनगर येथे गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले. याचा अर्थ त्यांनी सांसारिक जीवनाचा त्याग करून निर्वाण प्राप्त केले.

बुद्ध पौर्णिमा 2024 ची वेळ काय आहे?

बुद्ध पौर्णिमा गुरुवार दिनांक २३ मे २०२४ रोजी असून पौर्णिमेचा शुभ दिवस बुधवार दिनांक २२ मे २०२४ पासून सुरू होतो. बुद्ध पौर्णिमेची तिथी २२ मे रोजी संध्याकाळी ५ वाजून ५७ मिनिटांनी सुरू होणार आहे. बुद्ध पौर्णिमा २३ मे रोजी संध्याकाळी ६ वाजून ४१ मिनिटांनी संपणार आहे.

भारतात बुद्ध पौर्णिमा कधी साजरी केली जाते?

भारतात बुद्ध पौर्णिमा दरवर्षी वैशाख पूर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. २०२४ मध्ये, बुद्ध पौर्णिमा २३ मे रोजी साजरी केली जाईल.

बुद्ध पौर्णिमेला करा या गोष्टी (बुद्ध पौर्णिमा कशी साजरी केली जाते?)

धार्मिक विधी:

 • मठ आणि विहारांना भेट: बुद्धांच्या मूर्तींचे दर्शन घ्या, धम्मचक्र प्रवर्तन, बुद्धवंदना करा आणि प्रार्थना करा.
 • ध्यानधारणा करा: शांतता आणि आत्मचिंतनासाठी ध्यानधारणा करू शकता.
 • बुद्धांच्या शिकवणींचा अभ्यास करा: “धम्मपद”, “जातक कथा” सारख्या ग्रंथांचा अभ्यास करा.
 • दान करा: गरजू आणि गरीब लोकांना दान द्या.
 • अहिंसा आणि करुणा : सर्व प्राण्यांबद्दल दयाळूपणा आणि आदर दाखवा.

सामाजिक कार्यक्रम:

 • बुद्ध पौर्णिमा कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा: अनेक ठिकाणी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.या कार्यक्रमांत आपण सहभाग नोंदवू शकता.
 • बौद्ध धर्माबद्दल जाणून घ्या: या धर्माचा इतिहास, तत्त्वज्ञान आणि परंपरा यांचा अभ्यास करा.
 • बुद्धांच्या जीवनावर आधारित चित्रपट किंवा नाटक पहा.
 • बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा संदेश पाठवा.

याव्यतिरिक्त:

 • तुम्ही तुमच्या घरात बुद्धांची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवू शकता आणि त्याचे पूजन करू शकता.
 • तुम्ही तुमच्या घरात बुद्ध पौर्णिमेला दिवे लावू शकता आणि घरात शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करू शकता.
 • तुम्ही बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने शाकाहारी भोजन बनवू शकता आणि तुमच्या कुटुंब आणि मित्रांसोबत ते शेअर करू शकता.

भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती कुठे झाली?

भगवान गौतम बुद्धांना बोधगया येथे ज्ञानप्राप्ती झाली.

बोधगया हे बिहार राज्यातील गया जिल्ह्यात वसलेले एक प्राचीन बौद्ध तीर्थक्षेत्र आहे. फाल्गुनी पूर्णिमेच्या रात्री वडाच्या वृक्षाखाली (आता बोधि वृक्ष म्हणून ओळखले जाते) ध्यान करताना बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली असे म्हटले जाते. बोधगया हे बौद्ध धर्मातील सर्वात पवित्र स्थळांपैकी एक आहे. जगभरातील लाखो भाविक आणि पर्यटक दरवर्षी या ठिकाणी भेट देतात. ज्ञानप्राप्तीचा स्मारक स्तंभ, बोधि वृक्ष,अनेक प्राचीन मठ आणि विहार येथे पाहायला मिळतात.

हिंदू धर्मात बौद्ध पौर्णिमेला महत्व असून वेगवेगळ्या प्रकारे ती साजरी करतात. पौराणिक मान्यतेनुसार वैशाख महिन्यात भगवान विष्णूची मनोभावे पूजा केल्याने अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण होतात. तसेच जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते. हिंदू धर्मात भगवान बुद्धांना विष्णूचा अवतार समजले जाते.

हे हि वाचा – विश्वकर्मा योजना काय आहे? PM विश्वकर्मा योजना नोंदणी, व्याजदर, फायदे आणि पात्रता

वैशाख पौर्णिमा (बुद्ध पौर्णिमा) पूजा पद्धत

 1. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करुन भगवान विष्णूची पूजा करावी.
 2. यानंतर पाण्याने भरलेली घागर ब्राह्मणाला दान करावी .
 3. संध्याकाळी सत्यनारायणाची कथा वाचावी, प्रसाद आणि पंचामृत वाटावे.
 4. भगवान विष्णूला नैवेद्य अर्पण करा आणि नंतर ब्राह्मणाला दान दिल्यानंतर उपवास सोडावा.

टीप : वरील सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा MahaReport चा कुठलाही हेतू नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *