शिवसैनिक ते राष्ट्रवादीचे आमदार..वाचा आमदार निलेश लंके यांचा प्रवास

Nilesh Lanke
निलेश ज्ञानदेव लंके हे नाव सध्या राज्यभर चर्चेत आहे. अहमदनगर जिल्हयातील पारनेर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके (MLA Nilesh Lanke) सध्या आपल्या कामाच्या शैलीमुळे राज्यभर चर्चेत आहेत. सोशल मीडियावर फक्त निलेश लंके या नावाचीच हवा चर्चा सध्या सुरू आहे. या लेखाच्या माध्यमातून निलेश लंके यांच्या कारकीर्दीवर टाकलेला हा प्रकाश-

कोरोना काळात आपल्या कामाने प्रकाशझोतात आलेला एक आमदार म्हणजेच निलेश लंके. स्वखर्चाने तब्बल ११०० बेडचे कोविडं सेंटर सुरू करणारे राज्यातील एकमेव आमदार. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही आमदार निलेश लंके यांनी चांगल्या प्रकारे समाजसेवा केली. दुसऱ्या लाटेत त्यांनी अधिक सक्रिय होऊन मतदारसंघातील रुग्णांव्यतिरिक्त महाराष्ट्रातील इतर भागातील रुग्णांचीही सेवा केली असून आपल्या कामाच्या पद्धतीमुळे ते सर्वांचे लाडके आमदार म्हणून आज ओळखले जाऊ लागले आहेत.

निलेश लंकेचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला. वडील शिक्षक तर आई गृहिणी. घरात राजकारणाचा तसा दूरवर संबंध नाही. दहावी पास झाल्यानंतर निलेश लंके यांनी आयटीआय केले व एका खाजगी कंपनीत कामाला लागले. या नोकरीत त्यांचे मन रमले नाही. नोकरी सोडून पुढे त्यांनी चहाची टपरी टाकली मात्र त्यातही त्यांना जास्त काही यश आले नाही. संघटन कौशल्य हा गुण त्यांच्यात आधीपासूनच होता. निलेश लंके यांनी आधी शिवसैनिक म्हणून कामाला सुरुवात केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांना ते आपला आदर्श मानत. स्वतःच्या गावात शिवसेनेची सत्ता आणायची असा चंग लंकेंन्नी बांधला. गावात पॅनल उभा केला आणि निवडूनही आणला. त्यांनी या निवडणुकीत स्वतःही फॉर्म भरला होता परंतु वय कमी असल्याने त्यांचा अर्ज बाद झाला होता. या निवडणुकीत त्यांनी आपल्या नेतृत्वाची चमक दाखवली होती.

हे हि वाचा-

..म्हणून दादा कोंडकेंनी नाकारले मंत्रिपद.

पुढे जाऊन निलेश लंके यांनी पंचायत समितीची निवडणूक लढवली मात्र यात त्यांचा पराभव झाला. या निवडणुकीने त्यांना तालुक्यात ओळख मिळाली. सुपा MIDC मध्ये असलेली दलाल लोकांची टोळी मोडून काढून त्यांनी स्थानिक तरुणांना रोजगार मिळवून देण्याचे प्रयत्न केले. यातून तरुणाई त्यांच्या पाठीशी भक्कम उभी राहिली. पुढे स्वतःच्या गावची ग्रामपंचायत ताब्यात घेऊन सरपंचपदी विराजमान झाले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन शिवसेनेने त्यांना पारनेर शिवसेना तालुकाप्रमुख हे महत्त्वाचे पद दिले. २०१२ साली लंके यांच्या पत्नी सौ.राणीताई लंके या सुपा गणातून विजयी होऊन पारनेर पंचायत समितीच्या उपसभापती झाल्या. पुढे जाऊन २०१७ साली राणीताई लंके या जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झाल्या.घरात राजकारणातील अनेक पदे येत असली तरी निलेश लंके यांचे राहणीमान सामान्य होते. आजही ते सामान्य घरात राहतात. कुणालाही सहज उपलब्ध होणे ही त्यांची जमेची बाजू. मतदार संघात लग्नकार्य, वास्तुशांती किंवा कुणाच्या दुःखद प्रसंगी ही ते कायम जनतेच्या सोबत असतात.

पारनेर मतदार संघ हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला. विजयराव औटी येथून सलग ३ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. २०१८-१९ या काळात त्यांना महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष हे पदही मिळाले. त्यामुळे २०१९ विधानसभेला शिवसेनेकडून त्यांनाच तिकीट मिळणार हे जवळपास निश्चित होते. विजय औटींच्या विजयात निलेश लंके यांनी महत्वाच्या भूमिका बजावल्या होत्या. मतदार संघाचा पूर्ण अभ्यास त्यांचा झाला होता. २०१९ ची विधानसभा लंके यांनी लढवावी अशी इच्छा अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्याजवळ बोलून दाखवली होती. याच दरम्यान लंके आणि औटी यांच्या खटके उडायला सुरुवात झाली. मार्च २०१८ मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पारनेर येथे सभा आयोजित केली होती. या सभेत बराच गोंधळ झाला. या गोंधळाला निलेश लंकेच जबाबदार आहेत असं मातोश्रीला पटवून देण्यात लंकेच्या विरोधकांना यश आले.याचाच परिणाम म्हणून निलेश लंके यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाली. अनेक कार्यकर्ते या निर्णयामुळे नाराज झाले. आपल्या कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव निलेश लंके प्रतिष्ठान ची स्थापना लंके यांनी केली. अनेक जिल्ह्यात याच्या शाखा उघडल्या गेल्या. राष्ट्रवादी ला पारनेर मतदार संघात उमेदवाराची चणचण होती, त्यांनी निलेश लंके यांचे काम हेरून २०१९ रोजी त्यांना पक्षात प्रवेश दिला. त्यांनतर लंके यांनी मतदार संघ पिंजून काढला.लंके- औटी यांच्यात विधानसभेचा सामना झाला. लंके तब्बल ६१ हजार मतांनी निवडून आले.

मी महाराष्ट्रातला एकमेव असा आमदार असेल ज्याला लोकांनी निवडणुक लढवण्यासाठी पैसे दिले असे निलेश लंके नेहमी अभिमानाने सांगत असतात. आमदार झाल्यांनातरही लंके आजही पूर्वीप्रमाणेच लोकांमध्ये मिसळतात. त्यांचे कोविडं सेंटर मध्ये स्वतः रुग्णांची काळजी घेताना, कोविडं सेंटर मध्येच झोपलेले असतानाचे विडिओ आपण पहिलेच असेल. मतदार संघातील लोकांसाठी ते जनता दरबार दर आठवड्याला भरवत असतात. अल्पावधीतच केलेल्या कामांमुळे ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजितदादा पवार, सुप्रिया सुळे यांच्या आवडीचे झाले आहेत. जनतेची काळजी घेत असताना तू स्वतःचीही काळजी घे असा वडीलकीचा सल्ला त्यांना शरद पवारांनी दिला. समाजसेवक अण्णा हजारे यांनीही लंके यांच्या कामाचे कौतुक केले आहे. दिवंगत आर.आर.पाटील यांच्या नंतर लोकप्रियता लाभलेला राष्ट्रवादीतील आमदार म्हणजे निलेश लंके.
२०२४ लोकसभेला सूत्र बदलणार?

लोकसभेला नगर दक्षिण हा लंके यांचा मतदार संघ असून त्यात सध्या भाजपचे सुजय विखे हे खासदार आहेत. विखे-पवार वादाची पार्श्वभूमी त्याला आहे.त्यापूर्वी दिवंगत खासदार दिलीप गांधी यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. राष्ट्रवादीला अनेक वर्षांपासून या मतदारसंघात तगडा उमेदवार मिळत नाही. पारनेर याच मतदार संघात असल्याने पुढील लोकसभेला निलेश लंके राष्ट्रवादीचे उमेदवार असतील का? या चर्चा आतापासूनच जिल्ह्यात सुरू आहेत.

निलेश लंके यांची राजकीय कारकीर्द

निलेश ज्ञानदेव लंके हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्रातील पारनेर मतदारसंघाचे आमदार आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत.

निलेश लंके यांचा जन्म 10 मार्च 1980 रोजी महाराष्ट्रातील पारनेर तालुक्यातील हंगा गावात झाला. त्यांचे वडील ज्ञानदेव लंके हे एक शेतकरी आहेत. निलेश लंके यांनी 1995 साली दहावी व 1997 साली बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली. पुढे त्यांनी आयटीआय चे व्यवसायिक शिक्षण घेतले. याच वयात त्यांनी हंगा गावातील ग्रामपंचायत निवडणूकीला स्वतःचा पॅनल उभा करून अकरा जागांवर विजय मिळवून दिला. परंतु त्यांचे स्वतःचे वय कमी असल्याने त्यांनी निवडणूक लढविली नव्हती.

निलेश लंके यांनी 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पारनेर मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजयी झाले. निवडणुकीत त्यांनी भाजपच्या उमेदवाराला 14 हजार 600 मतांनी पराभूत केले.

निलेश लंके यांची राजकीय कारकीर्द ही एक नवीन कारकीर्द आहे. त्यांनी 2019 मध्ये प्रथमच निवडणूक लढवली आणि विजयी झाले. निवडून आल्यानंतर त्यांनी मतदारसंघात अनेक विकासकामांची सुरुवात केली आहे.

निलेश लंके यांना एक युवा आणि आक्रमक नेता म्हणून ओळखले जाते. ते आपल्या मतदारसंघात लोकप्रिय आहेत. ते मतदारसंघात विकासकामांसाठी नेहमीच प्रयत्नशील असतात.

पारनेर विधानसभा मतदार संघाची माहिती

पारनेर विधानसभा मतदार संघ हा महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मोडतो.

मतदारसंघाची रचना

पारनेर विधानसभा मतदारसंघात अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुका आणि अहमदनगर तालुक्यातील नाळेगाव आणि चास या महसूल मंडळांचा समावेश होतो.

मतदारसंघाची लोकसंख्या

2011 च्या जनगणनेनुसार, पारनेर विधानसभा मतदारसंघाची लोकसंख्या 3,06,292 आहे. यापैकी 1,52,241 पुरुष आणि 1,54,051 महिला आहेत.

मतदारसंघाची निवडणूक इतिहास

पारनेर विधानसभा मतदारसंघात 1962 पासून निवडणुका होत आहेत. या मतदारसंघातून एकूण 12 निवडणुका झाल्या आहेत.

पारनेर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार

पारनेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार निलेश ज्ञानदेव लंके आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत. त्यांनी 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला 14 हजार 600 मतांनी पराभूत केले.

पारनेर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख समस्या

पारनेर विधानसभा मतदारसंघात अनेक प्रमुख समस्या आहेत. यामध्ये पाणीटंचाई, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण या समस्यांचा समावेश होतो. या समस्यांवर उपाययोजना करणे हे विद्यमान आमदार आणि सरकारचे आव्हान आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *