अक्षय तृतीया म्हणजे काय? अक्षय तृतीया का साजरी केली जाते? जाणून घ्या अक्षय तृतीया २०२४ चा मुहूर्त

अक्षय तृतीया का साजरी करतात
Akshay Tritiya 2024 : – अक्षय तृतीयेच्या (Akshay Trutiya 2024) दिवसाला हिंदू धर्मामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. अक्षय तृतीयेचा दिवस हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त समजला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेक लोक नवीन घर गाडी आणि सोन्या नाण्याची खरेदी करतात. अक्षय तृतीयेचा दिवस हा खरेदीसाठी शुभ दिवस मानला जातो. जाणून घेऊया 2024 या वर्षी अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त कधी आहे याबद्दलची संपूर्ण माहिती.

अक्षय तृतीया २०२४ कधी आहे?

अक्षय तृतीया दरवर्षी वैशाख शुक्ल तृतीयेला साजरी केली जाते. २०२४ या वर्षी वैशाख शुक्ल तृतीया शुक्रवारी, १० मे रोजी पहाटे ०४:१७ वाजता सुरू होईल. ही तिथी शनिवारी, ११ मे रोजी मध्यरात्री ०२:५० पर्यंत राहील. म्हणजेच उदय तिथीनुसार, या वर्षी अक्षय्य तृतीया १० मे रोजी आहे.

अक्षय तृतीया २०२४ पूजा मुहूर्त –

या वर्षी अक्षय तृतीयेच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी ०५:33 ते दुपारी १२:१८ पर्यंत आहे. जवळपास ६ तासांचा शुभ मुहूर्त पूजेसाठी असून या वर्षी दिवशी रवि योग देखील जुळून आला आहे.

अक्षय तृतीया म्हणजे काय?

अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक अत्यंत शुभ आणि पवित्र दिवस आहे. वैशाख शुक्ल तृतीयेला साजरा केला जाणारा हा दिवस साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो.

अक्षय तृतीयेचे महत्त्व:-

दान-पुण्य: या दिवशी केलेले दान फलदायी मानले जाते, म्हणून या दिवशी दान-पुण्य करण्याची विशेष प्रथा आहे.

नवीन उपक्रम: अक्षय तृतीयेला नवीन संकल्प करणे शुभ मानले जाते.

विवाह: हा विवाह करण्यासाठीही शुभ दिवस मानला जातो. अक्षय तृतीयेचा दिवस हा लग्नासाठी चांगला मुहूर्त समजला जातो.

तीर्थयात्रा: या दिवशी तीर्थयात्रा करणे विशेष फलदायी मानले जाते.

पूर्वजांचे स्मरण – अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या पूर्वजांचे स्मरण केले जाते. घरात गोड जेवण बनवून आपल्या पूर्वजांना नैवेद्य दाखवला जातो.

अक्षय्य तृतीया २०२४ खरेदीसाठी शुभ मुहूर्त –

अक्षय्य तृतीयेला दिवसभर शुभ मुहूर्त असतो. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तुम्ही सूर्योदयापासून रात्रीपर्यंत कधीही खरेदी करू शकता.अक्षय्य तृतीयेला सोनं, दागिने, घर, दुकान, गाडी, जमीन, प्लॉट इत्यादी खरेदी करणं फार शुभ ठरतं.

अक्षय्य तृतीयेचे अध्यात्मिक महत्व

अक्षय तृतीयेशी अनेक पौराणिक कथा जोडल्या आहेत. यापैकी काही प्रसिद्ध कथा खालीलप्रमाणे:

भगवान परशुरामाचा जन्म: भगवान विष्णूचे सहावे अवतार असलेले भगवान परशुराम यांचा जन्म अक्षय तृतीयेला झाला असे मानले जाते.

वेद व्यासांचा जन्म: महाभारताचे रचयिता असलेले महर्षी वेद व्यास यांचा जन्म अक्षय तृतीयेला झाला असे म्हटले जाते.

भगवान नृसिंहाचा अवतार: अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूने नृसिंहाचा अवतार घेतला असे मानतात.

गंगा नदी पृथ्वीवर अवतरली: अक्षय तृतीयेला गंगा नदी पृथ्वीवर अवतरली असे मानले जाते.

कुरुक्षेत्र युद्धाची सुरुवात: महाभारतातील प्रसिद्ध कुरुक्षेत्र युद्धाची सुरुवात अक्षय तृतीयेला झाली असे मानले जाते.

अक्षय तृतीयेच्या दिवशी घरी लावा तुळशीचे रोप.

तुळस ही भगवान विष्णू तसेच लक्ष्मी मातेला ही प्रिय असते त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुळशीचे रोप घेऊन त्याची पूजा केली जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून ब्रह्म मुहूर्तावर आंघोळ करून आपण सूर्य देवाची पूजा करू शकता त्यानंतर भगवान विष्णूची देखील आपण पूजा करू शकता.
भगवान विष्णूच्या मंत्राच्या जपाने आपण तुळशीचे रोप अंगणात किंवा घरात लावू शकता तुळशीचे रोप लावल्यामुळे आनंद आणि समृद्धी आपल्या घरात येते असे म्हटले जाते. श्री तुलसी देवी नमः या मंत्राचा आपण जप करावा. तुळशीचे रोप लावल्यानंतर या रोपाला रोज पाणी द्यावे यामुळे आपल्या घरात सुख आणि समृद्धी नांदते.

हे हि वाचा – विश्वकर्मा योजना काय आहे? PM विश्वकर्मा योजना नोंदणी, व्याजदर, फायदे आणि पात्रता

अक्षय तृतीयेला सोने का खरेदी करतात?

अक्षय तृतीयेला सोने खरेदी करण्यामागे अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कारणे आहेत. यापैकी काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे:

धार्मिक कारणे:

लक्ष्मी आणि कुबेर यांचा आशीर्वाद: सोने हे लक्ष्मी देवी आणि कुबेर यांच्याशी संबंधित मानले जाते. अक्षय तृतीयेला सोने खरेदी केल्याने या दोन्ही देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि घरात समृद्धी येते असे मानले जाते.

अक्षय फल: अक्षय तृतीयेचा अर्थच “अक्षय फलदायी” असा होतो. या दिवशी केलेले पुण्य कर्म अक्षय फलदायी मानले जातात. त्यामुळे, या दिवशी सोने खरेदी केल्याने ते अक्षय राहते आणि आपल्याला सदैव समृद्धी देते असे मानले जाते.

भगवान विष्णू: अक्षय तृतीया हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे. भगवान विष्णूचे आंगण सोनेरी आहे असे मानले जाते. त्यामुळे, या दिवशी सोने खरेदी केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो असे मानले जाते.

सांस्कृतिक कारणे:

शुभ मुहूर्त: अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील सर्वात शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी नवीन खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे, अनेक लोक या दिवशी सोने खरेदी करतात.

गुंतवणूक: सोने हे एक चांगले गुंतवणुकीचे साधन मानले जाते. अक्षय तृतीयेला सोन्याचे भाव कमी असल्याचे मानले जाते. त्यामुळे, अनेक लोक या दिवशी सोने खरेदी करतात. सोन्यात गुंतवणूक करणे अनेक जण फायद्याचे समजतात.

सामाजिक रीतिरिवाज: अनेक हिंदू समुदायांमध्ये अक्षय तृतीयेला सोने खरेदी करण्याची सामाजिक रीतिरिवाज आहे. विशेषतः, विवाह आणि लग्नासारख्या शुभ प्रसंगी सोने खरेदी करणे आवश्यक मानले जाते.

टीप – वरील सर्व माहिती हि धार्मिक ग्रंथ आणि पुराणांतून घेतली असून आपण आपल्या श्रेद्धेप्रमाणे श्रीराम नवमी साजरी करू शकता. वरील माहितीतून कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा MahaReport चा हेतू नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *